मयुर काकडे यांना प्रहार पक्षाची धाराशिव लोकसभेच्या उमेदवारीची करणार मागणी ..संपर्कप्रमुख नागनाथ नरुटे पाटील.... प्रहार जनशक्ती पक्ष धाराशिव जिल्ह्याचे चे संपर्कप्रमुख नागनाथ नरुटे पाटील यांनी प्रहार पक्षाचे शहरी जिल्हाप्रमुख मयुर काकडे यांची धाराशिव लोकसभेच्या उमेदवारी करिता मागणी पत्राद्वारे करणार असल्याचे सांगितले जिल्हाभरातून प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून मयुर काकडे याच्या नावाची चर्चा व मागणी वाढत असून आजपर्यंत समाजातील साधारण व दुर्लक्षित घटकासह समाजातील सर्व घटकांचे कार्य करण्याचे काम मयुर काकडे यांच्या माध्यमातून सतत होत आहे सर्वसाधारण जनतेत देखील मयुर काकडे याना उमेदवारी मिळावी अशी मागणी वारंवार माझ्याकडे होत आहे असे नागनाथ नरुटे पाटील यांनी पत्राद्वारे कळविले आहे, प्रहारचे जुने व एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून देखील मयुर काकडे यांची ओळख आहे मागील 10 ते 15 वर्षापासून प्रहारचे नाव वाढण्याचे कार्य मयुर काकडे यांनी केले आहे. तसेच त्यांना महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार 2022 प्रधान करण्यात आला व असे अनेक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. तसेच ते उच्च शिक्षित व पदवीदर असून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करावी. अशी मागणी ही जिल्हासंपर्क प्रमुख नागनाथ नरुटे पाटील यांच्या प्रहारचे बाळासाहेब कसबे, महेश माळी, बाळासाहेब पाटील, महादेव चोपदार, जमीर शेख, अजीम खजुरे, मारुती पाटील, हेमंत उंदरे, गणेश शिंदे, महंमद आतार, इसाक शेख, श्रीमंत गरड, छाया शेरकर, दत्ता पवार, विठ्ठल चव्हाण, अमोल शेळके गोकुळ गवारे, तालुका उपाध्यक्ष, हंबीरराव मुळे तालुका संघटक, बापू जगताप, सोमनाथ गायकवाड, अण्णासाहेब कोचाळे, बाळू काळे, यशवंत काळे, लक्ष्मण शिंदे सतीश ताकमोडे, गजेंद्र कांबळे, हरी पाटील, सत्य सिंग सल्ले, प्रदीप आवळे, पांडुरंग खरात, महादेव ठवरे, गौस भाई, अनिल जाधव, भाऊसाहेब शिंगाडे यांच्या वतीने करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post