श्रीरामपूर (प्रतिनिधी)- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलयांच्या समवेत दिव्यांगांच्या विविध समस्या

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलयांच्या समवेत दिव्यांगांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आसान दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन माजी जि. प. सदस्य शरद नवले दिले.अपंग सामाजिक विकास संस्था आणि आसान दिव्यांग संघटनेच्यावतीने दिव्यांगाकरिता पिठाची गिरणी व तीन चाकी सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात अंध गायक खोकर शाखेचे अध्यक्ष विकास साळवे यांच्या सुमधुर गीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सारिका कुंकूलोळ होत्या. तर माजी जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती बाबासाहेब दिघे, सुनील शिरसाठ, मुस्ताकभाई शेख, दिनेश तरटे, वर्षा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विरेश रंधे, किरण ढोणे, सुरेखा वाघ, वंदना उबाळे या दिव्यांग व्यक्तींना पिठाची गिरणी देण्यात आली. त्याचबरोबर बाबासाहेब लाटे व सुमन सोनवणे यांना तीन चाकी सायकल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कार्यक्रमासाठी विजय कुन्हे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्षा गायकवाड, मुश्ताकभाई तांबोळी, सुनील कानडे, विश्वास काळे, साधना चुडीवाल, विमल जाधव, विकास साळवे, जनार्दन पुजारी, विलास साळवे, गंगाधर सोमवंशी, दत्तात्रय आदी हजर होते

Post a Comment

Previous Post Next Post