जयहिंद लोकचळवळ आणि श्री छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत पीक विमा काढून मिळणार !
खामगाव : जयहिंद लोकचळवळ आणि श्री छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत पीक विमा काढून मिळणार आहे. त्यासाठी खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी संघटनेच्या एकता कॉप्म्प्लेक्स जलंब नाका नांदुरा रोड खामगाव येथील कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन जयहिंद लोकचळवळ जिल्हा समन्वयक स्वप्नील ठाकरे पाटील यांनी केले आहे.
रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना प्रति अर्ज एक रुपयात पीक विमा लागू असेल. याबाबतची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिकते प्रमाणे योजनेत सहभागी होता येईल
शेतकऱ्यांना गहू, हरभरा, रब्बी, गहू आणि कांदा या पिकासाठी 15 डिसेंबर 2024 पर्यंत पीक विमा अर्ज करता येणार आहे. पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा, या कागदपत्रासह जयहिंद लोकचळवळ आणि श्री छत्रपती प्रतिष्ठानच्या एकता कॉप्म्प्लेक्स जलंब नाका नांदुरा रोड खामगाव येथील कार्यालयात दुपारी १२ ते ३ यावेळेत उपस्थित रहावे तसेच अधिक माहितीसाठी 9226119476 मोबाईल क्रमांकावर, संपर्क करावा असे आवाहन स्वप्नील ठाकरे पाटील यांनी केले आहे.