गावाच्या इतिहासात दिव्यांग व्यक्तीला मिळाला न्याय,घारोड येथे ज्ञानदेव इंगोले या दिव्यांगास व्हीलचेअर वितरण लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर फुलले स्मित हास्य खामगाव(प्रतिनिधी ) दि. १०ऑगस्ट - तालुक्यातील ग्राम घारोड येथे इतिहासात पहिल्यांदाच दिव्यांग व्यक्तीला न्याय मिळाल्याचे उदाहरण समोर आले आहे आणि दिव्यांग व्यक्तीला पायाने चालता येत नसल्याने त्यांना फार मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते याबाबतीतली दखल घारोड ग्रामपंचायत ने घेतली आज पर्यंत ही गावात दिव्यांगांना 5% निधी मिळालेला नव्हता त्यामुळे लोकशाहीच्या राज्यात घारोड ग्रामपंचायत ही दिव्यांगांना न्याय मिळवून देणारी सर्वाधिक नामांकनाची ठरल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहेवेळोवेळी दिव्यांग व्यक्तींच्या मागण्यांबाबत सकारात्मक असलेला सरपंच वैभव ठाकरे यांनी गावातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे धोरण ठरवले आहे त्याचाच एक भाग म्हणून घारोड ग्रामपंचायतीच्या वतीने पाच टक्के दिव्यांग निधीमधून गावातील गरजू दिव्यांगास उपयुक्त अशी व्हीलचेअर वितरण करण्यात आले. त्यावेळी सरपंच वैभव किशोर ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय माथनकार, जनार्दन कड, भगवान बोरे, राहुल परकाळे, ज्येष्ठ समाजसेवक बाबुराव इंगोले, कामगार नेते सुनील इंगोले, प्रल्हाद जगदेव इंगोले नितेश खरात आणि दिव्यागं बांधव व गावातील नागरिक आदी उपस्थीत होते. गावातील ज्ञानदेव दगडू इंगोले हे गेल्या अनेक वर्षांपासून पायाने दिव्यांग असून ते त्यांच्या दिव्यांगात्वामुळे अंथरुणावर आहेत. त्यामुळे त्यांना उपयुक्त असणारी व्हीलचेअर ग्रामपंचायतच्या वतीने आज त्यांना प्रदान करण्यात आली. याप्रसंगी या दिव्यांगाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून त्यांनी ग्रामपंचायतचे आभार मानले.
byदिव्यांग शक्ती
-
0