प्रेस नोट खामगांव येथे भीम आर्मीची संवाद बैठक संपन्न.खामगाव -05 -भीम आर्मी भारत एकता मिशन संस्थापक खासदार भाई चंद्रशेखर आझादयांचा संपूर्ण देशात सुरू असलेला झंझावात बघता बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव तालुका हॉटेल हेरिटेज येथे भीम आर्मीची संवाद बैठक जिल्हा अध्यक्ष भाई सतीश दादा पवार व जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र खंडेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.सतिश दादा पवार यांनी मार्गदर्शन करतांना बैठकीत खामगाव सह संपूर्ण जिल्यातील जनतेचे प्रश्न, समस्या, सोडविण्याची मोहीम आज पासून भीम आर्मी हाती घेणार आहे. वन कॉल प्रॉब्लेम सॉल हे अभियान भीम आर्मी जिल्ह्यात राबवणार आहे असे सांगितले.येणाऱ्या विधान सभे मध्ये भीम आर्मी जिल्ह्यात उमेदवार उभे करणार असून भीम आर्मी ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे सतिश दादा पवार यांनी बैठकीत जाहीर केले आहे.जिल्ह्यात होणारे अन्याय, अत्याचार यांच्या विरोधात भीम आर्मी ताकदीने आवाज उठवणार असून तळागाळातील लोकांपर्यंत न्याय देण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे तसेच शिक्षण,रोजगार ,शेतकऱ्यांचे प्रश्न , आरोग्य, सुविधा या विषयावर सुद्धा भीम आर्मी सतत विशेष लक्ष ठेवणार आहे असे पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले . बैठकीमध्ये विविध संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांना भीम आर्मी मध्ये प्रवेश देण्यात आलायावेळी बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन खरात, अँड. कैलाश कदम विधी सल्लागार, जिल्हा सहसचिव शांताराम दामोदर, आर एस.मोरे,परेश ठाकरे, आकाश खंडेराव, संतोष हिवराळे, अमजद खान हबीब खान, अशरफ शेख रफिक शेख, राजेश मोरे, मोहम्मद अलियार, राहुल बावस्कर, रवी गवई, अभिलाष गवई, भूषण वकोडे, मंगेश गवई, विनय वानखेडे, गोवर्धन तेनंकर, यशवंत गवई, प्रकाश धुरंधर, अमोल मोरखेडे, राजू धन द्रवे, उमेश वानखेडे, रामकृष्ण दाभाडे, काशिनाथ राखोंडे, बालुभाऊ उगले, शेख सोहिन, शेख रिजवान व स्थानिक नागरिक बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.भीम आर्मीत सहभागी होण्यासाठी 97306 45130 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र खंडेराव यांनी केले आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0