*युगधर्मा स्कूल मध्ये कामगार दिन, महाराष्ट्र दिन तसेच राजभाषा दिन उत्साहात साजरा**खामगाव:-* येथील युगधर्मा पब्लिक स्कूल मध्ये अगदी मराठमोळ्या पद्धतीने महाराष्ट्र दिन, मराठी राभाषा दिन तसेच कामगार दिन साजरा करण्यात आला. या मध्ये मुलांचे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुलींनी दिग्निटी ऑफ लेबर हा ॲक्ट सादर केला. त्या मध्ये ऋतुजा सोनोने, रिया जैन, सेजल पडोळे,अनुष्का देशमुख,रुचिका निळे व वसुंधरा भाकरे या मुलींचा समावेश होता. तसेच मुलांनी भारुड सादर केले त्या मध्ये महिलांच्या नटण्या मागचे वैज्ञानिक कारण सांगितले त्या मध्ये सेजल पडोळे, अनुष्का भिसे, कृष्णा सुलताने,ऋतुजा सुलताने, सलोनी अडगळे यांचा समावेश होता. प्रांजल कोळसे, ऋतुजा सोनोने, सलोनी अडगले, अनुष्का भिसे व रिया जैन यांनी आपल्या गवळनीतून पारंपरिक सामाजिक जीवन प्रस्तुत केले.रुद्र इंगळे, अजिंक्य अंबोरे, शौर्य इंगळे, नैतिक तायडे, सलोनी कोळसे, प्रांजल कोळसे,रिया इंगोले या मुलांनी पोवाडा सादर करत त्या मराठी राजभाषेची महती पटवून दिले तसेच छोट्या मुलांनी महाराष्ट्राचे संपूर्ण दर्शन आपल्या महाराष्ट्र दर्शन मधून घडून दिले त्या मधे वासुदेव, महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक, वारकरी संप्रदाय, लावणी, गुढीपाडवा,कोळी , छञपती शिवाजी महाराज, गणेश पूजन तसेच महाराष्ट्रातील खाद्य पदार्थाचे प्रदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला महाविद्यालयाचे डॉ. वसंतजी डोंगरे सर, शिवागी बेकर्स चे व्यवस्थापक श्री तुकाराम भिसे सर तसेच हिगोले मॅम ह्या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे सोबत शाळेच्या मुख्याध्यापक मंगला महाजन मॅम, संदीप सपकाळ यांनी ध्वजा रोहन केले तसेच मुलांनी बनविलेल्या किल्ल्यांची पाहणी केली आणि किल्ले बनविण्याच्या स्पर्धेचा निकाल लावला. कामगार दिना निमित्त शाळेचे अध्यक्ष गोपलजी अग्रवाल आणि सेक्रेटरी मधुर जी अग्रवाल यांनी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांरी वर्गाचे आभार मानले. त्या मध्ये शाळेतील दीदी वैशाली सुलतानेदीदी, प्रज्ञा दीदी, पूजा दीदी, संगीता दीदी, ढोले दीदी, लता दीदी तसेच पुरुषोत्तम दादा यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाचे सू्रसंचालन भविन आखरे सर यांनी केले तर श्री दीपक लोन सर यांनी आपल्या भाषणातून मुलांना महाराष्ट्र दिन, कामगार दीन व मराठी राजभाषा दीन याचे महत्व या मागील इतिहास सांगितला रेणुका देशमुख मॅम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली पासायदाचे गायन श्री राम दांडे सर संगीता देशमुख मॅम, रेणुका देशमुख मॅम सोबत इयत्ता पाचवीतील पर्थ भाकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी शाळेच्या मुख्याध्यापक मंगला महाजन यांच्या मार्गदर्शना खाली सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच सर्व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
byदिव्यांग शक्ती
-
0