*शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जनाधिकार - जनता दरबार कार्यक्रमाने आळंदच्या भाउबंधकी चे भांडण निस्तरले.*
मलकापूर येथे शिवसेने तर्फे आयोजित जनता दरबारात सौ. संतोषी संतोष भगत रा. आळंद यांनी मांडली होती समस्या.
मलकापूर: शिवसेनेने जनाधिकार - जनता दरबार कार्यक्रम मलकापूरातील पंचायत समिती भवन येथे आयोजित केला होता. सदर कार्यक्रमामध्ये सौ. संतोषी संतोष भगत रा. आळंद यांनी शिवसेनेच्या जनधिकार जनता दरबार या कार्यक्रमाला हजर राहून त्यांची व्यथा मांडली. आळंद चे पोलीस पाटील श्री. तेजरव यशवंत भगत यांचे त्यांचे भाऊ माणिकराव यशवंत भगत तथा त्यांचे पुतणे अतुल माणिकराव भगत व संतोष माणिकराव भगत यांच्यात शेतातील रस्त्या व बांधा वरून जानेवारी २०२१ मधे तुंबळ हाणामारी झाली होती. परिणामास्वरूप एकमेकांविरुद्ध फौजदारी खटले दाखल झालेले होते. त्यामुळे आज वर त्यांची भाऊबंदकी तुटली होती. नववधू सौ. संतोषी संतोष भगत यांना सदर बाब खटकली, त्यांनी सदर विषय शिवसेनेच्या जनता दरबारात तालुका प्रमुख श्री. दिपक चांभारे पाटील यांना सांगितला. सर्व विषय समजून दोन्ही पक्षकारांना तथा त्यांचे वकील ॲड. निलेश तायडे व ॲड. सुनील मारोती तायडे सर्वांना त्यांच्या कार्यालयात बोलवून घेतले. पुढच्या तारखेवर संपूर्ण विषय सलोख्याने सोडवण्या बाबत सांगितले, यावर सर्वांनी देखील एकमुखाने तालुका प्रमुखांच्या शब्दाला मान देत होकार दिला व भाउबंधकी चे भांडण निस्तरले. यावेळी गावातील रमेश खापोटे हे देखील हजर होते.
"अशाप्रकार च्या कुठल्याही समस्या असो शिवसेना संपूर्ण तन-मन-धनाने आपल्या पाठीशी राहणार व जिल्हा प्रमुख श्री. वसंतरावजी भोजने यांच्या नेतृत्वात दर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या सोमवारी शिवसेनेचा जनता दरबार हा पंचायत समितीच्या भावना मध्ये सकाळी आकरा ते दुपारी दोन या कालावधीत होणार. आपण आपल्या समस्या तेथे मंडण्याबाबत दिपक चांभारे पाटील, शिवसेना, तालुकाप्रमुख. मो. क्र. ७७१९९३४२२२" यांनी आव्हान केले आहे.