वार्ता
*दिव्यांग शक्ती*
*खामगाव शिवाजीनगर हद्दीत*
*मुकबधिर दिव्यांगास मारहाण प्रकरणी उतर कलमादखल परंतु दिव्यांग असल्याचे सांगितल्यानंतरही दिव्यांग कायद्याची नोंद पोलिस दप्तरी नाही*
खामगाव शेखर तायडे
शिवाजी नगर पोलिस स्टेशन मधील
सदर हकिकत अशी कि फिर्यादी यांनी माझे वडील सुभाष किसन खंडेराव व भाउ सुरेश मुलासह खुटपुरी येथे राहतो , माझे वडीलांनी2002 मध्ये आमच्या शेजारी राहणारा गजानन तुकाराम सरकटे याचेकडुन खाली प्लाट विकत घेतला आहे, सदर जागेची 7/12 उतारा नोंद केलेली नसल्याने गजानन सरकटे हा वारंवार आमच्याशी वाद प्लाट माझा आहे मला परत दया, असे बोलुन आमच्याशी भांडण करत असतो. त्याबाबत यापुर्वी 2024 गध्ये माझे वडील यांनी तसेच पुन्हा दि. १२/०३/२०२४ सकाळी मी स्वता गजानन सरकटे याचा पोलीस स्टेशनला रीपोर्ट दिला आहे. दिनांक 12/03/2024 रोजी रात्री 09.30 वाजता चे सुमारास मी घरात हजर असताना गजानन सरकटे हा आमचे घरात आला व मला म्हणाला की, तु सकाळी माझा रिपोर्ट दिला . अश्लील शिवीगाळ करुन मला लोटपाट करायला लागला. माझे वडील व भाउ हे त्याला आवरण्यास गेले असता त्याचा मुलगा राजेश सरकटे याने माझा (मुकबधिर) भाउ यास खाली पाडुन लाथां बुक्यांनी मारहान केली वडीलांना लोटपाट करून शिवीगाळ केली. गजानन याची भावजय व ईतर यांनी माझे केस पकड़न ओढले व मला चापटांनी मारहान करुन लोटपाट केली. खाली पाडले माझे कपाळाला बेड आले असुन पायांना मुका मार लागला आहे. व माझा भाउ ला मुका मार लागला आहे. त्या सर्वांनी आम्हाला बाहेर ओढुन गजानन याने मला शिवीगाळ करत माझे काही वाकडे नाही होत असे बोलला. हा प्लाट माझाच आहे प्लाट परत नाही केला तर तुम्हाला सर्वांना जिवाने मारून टाकील अशी गल्लीत सर्वांसमोर श्री. भाड़ण सुर असताना तेथे गावातील मोहन अडायके, सचिन समाधान गवळी यांनी भांडण सोडवायचा प्रयत्न केला इतर अनेक लोक जमले होते परंतु कोणी मधात आले नाही. तरी गजानन सरकटेचा आम्हाला त्रास असल्याने मी पोलीस स्टेशनला येउन रिपोर्ट देत आहे. रिपोर्ट वरुन गुन्हा दाखल करून पुढील तपास मा. पोनि.सा यांचे आदेशाने बीट अंमलदार भगवान साखरे यांचेकडे देण्यात आला.परंतु सदर प्रकरणात फीर्यादीचा भाऊ १००%मुकबधिर दिव्यांग असल्याचे व त्याला मुक्याबहिर्या शब्दासह अपमानास्पद शिवीगाळीची भाषा वापरल्याचे सांगितल्यानंतरही सदर प्रकरणामध्ये दिव्यांग कायदाचा समावेश करण्यात आला नसल्याने शिवाजीनगर पोलिस स्टेशन विषयी शंका निर्माण होत आहे